हिंदुत्वात कोणताही दोष नाही
The article has been translated into Marathi by Professor Manohar Railkar
हिंदु असण्यात काहीही चुकीचं नाही. पण, हिंदुत्व अनुचित आहे, इतकंच नव्हे, तर ते धोकादायकही आहे, असं कित्येक हिंदूंना वाटतं. उलट, खरं म्हणजे हिंदुत्वम्हणजे हिंदु असणंच. तरीही कित्येक हिंदूंना हिंदुत्वाची लाज वाटते. “हिंदुत्व म्हणजे जातीय भूमिका घेणं आणि हिंदुत्ववादी पक्षांच्या अतिटोकाच्या कार्यक्रमांना पाठिंबा देणं.” अशी भूमिका आज कित्येक वर्षं माध्यमांनी हिंदूंच्या मनावर सातत्यानं ठसवली आहे. त्या प्रचाराला पुष्कळ हिंदु बळी पडलेले दिसतात. खरं तर माध्यमांनी ठसवलेलं हे वर्णन हिंदुत्वा मूळ खऱ्या स्वरूपाशी सुतराम विसंगत आहे.
माध्यमांनी केलेलं वर्णन सत्य आहे काय? मुळात असा दृष्टिकोन चुकीचा असल्याच निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 1995 मध्येच दिला आहे.
हिंदुत्व भारतीय जनांच्या जीवनाची एक पद्धत आहे. हिंदुत्वाला, अन्य उपासनामार्गांचा किंवा श्रद्धांचा शत्रु, द्वेष करणारा, असहिष्णु, किंवा संकुचित जातीय म्हणणं अनुचित आणि हिंदुत्वाच्या सत्य रूपाचा अकारण उपमर्द होय.
हिंदुत्वाचा खरा अर्थ समजून न घेता त्याला जातीय आणि संकुचित म्हणणं सर्वस्वी अनुचित आणि धोक्याचं आहे, अशा निर्णयाला मी आले. माझा आजवरचा अनुभव तोच आहे.
सेक्युलर आणि जातीय ह्या शब्दांमागचे नेमके अर्थ काय आहेत, ते समजून घेत घेत मी आध्यात्मिक भारतात वास करीत आहे. भारताची महान पार्श्वभूमी चांगली माहीत असणाऱ्या आणि तिची योग्य किंमत जाणणाऱ्या व्यक्तींना मी भेटले आहे. काय वाचायला हवं, कोणत्या साधुसंतांचं दर्शन घ्यावं, कोणत्या मंत्रांचा जप करावा, इत्यादी विषयांत त्यांचं मला भरपूर मार्गदर्शन लाभलं. त्या संदर्भात जर्मन नियतकालिकांतून मी लेखन केलं. आपल्या महान पूर्वजांची अंतर्दृषटी, त्यांनी सर्वांकरता ठेवलेला मोलाचा वारसा, जगात अतुलनीय ठरतील असे त्याचं ग्रंथ ह्या सर्वांबद्दल सर्व भारतीयांना अतोनात आदर असेल, असं मला वाटत होतं.
पण, काही काळ आश्रमापासून दूर असताना, परदेशीय पत्नी असणाऱ्या आणि इंग्रजीत बोलणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटंबाशी माझा संपर्क आला. माझ्या त्या परिचितांची नावं तर हिंदु होती, पण, स्वतःला हिंदुत्वाविषयी काडीचंसुद्धा ज्ञान नसताना त्याची ते टिंगल करताना पाहून मला सणसणीत धक्काच बसला. त्यांनी तर भगवद्गीताही वाचली नव्हती. तरी सर्व रिलिजनापेक्षा हिंदु धर्म कमालीचा हीन असल्याचं आणि देशाच्या बिकट अवस्थेला तोच कारण असल्याचं ते म्हणत होते. आणि त्याकरता जातिव्यवस्था उत्तरदायी. आणि पुरावा कोणता तर मनुस्मृती!
उलट, माझ्या संपर्कात आलेल्या ह्या नवपरिचितांनी चालवलेल्या अप्रगत हिंदुत्वाची ते जी निंदा करीत त्यांत मीही हातभार लावावा, अशी त्यांची अपेक्षा होती. पण, ते ठामपणं नाकारलं. कारण, भारतात आल्यावर मी जे वाचन केलं, जी काही साधना केली. त्या सर्वांमुळं त्यांच्यापेक्षा मलाच हिंदुत्वाची किती तरी माहिती झाली होती, आणि हिंदुत्वाचं खरं रूप मला “अचूक” कळलं होतं. गंमत म्हणजे स्वतःच्या दृष्टिकोनात काही चुकीचं असेल, अशी शंकाही त्यांना येत नव्हती.
माझ्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपण कम्यूनिस्ट असल्याचं सांगितलं. केव्हा तरी एकदा त्यांनी रास्वसंघाच्या एका प्रचारकांची माझ्याशी ओळख करून दिली. काहीसं विनोदी वाटावं, अशा प्रकारानं, पण त्यांची टर उडवण्याच्या हेतूनं ते बोलत होते. “ज्याअर्थी रास्वसंघालाही माझ्याप्रमाणंच वाटतं, त्याअर्थी ते तो चांगलाच असेल,” असं मला वाटलं.
मी हिंदुधर्माच्या वतीनं लिहिते म्हणून “ह्या महिला हिदु ब्रिगेडच्या कार्यकर्त्या आहेत,” अशी माझ्यावर टीकाही करण्यात आली. अर्थात ती काही एका राजकीय हेतूनं झाली असावी. आणि माझा दोष काय? हिंदुधर्म कोणत्याही समाजाला उपयोगी पडणारा सर्वोत्तम पर्याय आहे, असं म्हणण्याचं धाडस मी करते हाच. माझा हा दावा मुळीच निराधार नाही. ख्रिश्चनांचा आणि मुस्लीमांनी केलेल्या तसल्या दाव्याला कुणी आव्हान देत नाही, हे महत्त्वाचं आहे. पण हिंदुधर्मच सर्वांना आपल्यात सामावून घेणारा असून तो कधीही भेदभाव करीत नाही. पण, श्रद्धावंत ठेवणारे आणि अश्रद्ध अशी मानवसमाजाची वाटणी ख्रिश्चन आणि मुस्लीम रिलिजन करतात आणि आमच्या खऱ्या सत्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांना मरणोत्तर नरकाग्नीत जळत पडावं लागतं, अशी (निराधार) धमकीही देतात.
अर्थात माझी ही भूमिका जातीयही नाही आणि भारताकरता धोकादायकही नाही. हिंदुधर्म खरोखरीच सर्वसमावेशक आहे इतकंच नव्हे, तर मूलतः माणसांमाणसांत भेद करणाऱ्या, धोकादायक ख्रिश्चन किंवा मुस्लीमांपेक्षा सर्व व्यक्तींना उपकारक आहे आणि तो सर्वांना उपयुक्तही आहे. आणि हो, जर राजकारणी लोकांना जनतेची चांगली सेवा करायची इच्छा असेल तर त्यांनीही आपल्या जीवनाची आखणी हिंदुधर्मानुसारच करायला हवी. आंधळेपणानं विश्वास ठेवायला लावण्याला राजकारणात स्थान नाही. उलट, खऱ्या धर्माचा प्रसारच सर्वांना लाभदायक होईल.
माझ्या सेक्युलर मित्रांना त्यांच्या असल्या अज्ञानाबद्दल दोष देता यायचा नाही. कारण, हिंदु हासुद्धा एक रिलिजन असून अन्य दोन “सत्य” रिलिजनांपेक्षा हीन आहे, अशी शिकवणच त्यांना मिळाली होती. शिकत असताना बालकांना सहसा शंका येत नसते. तरीही हिंदुधर्म दोन्ही अब्राहमनी रिलिजनांपेक्षा पूर्ण निराळा आहे.
हिंदुधर्म तर्कदुष्ट विधानांवर कधीही आधारला नव्हता. आणि आपल्या अनुयायांना धाकात ठेवण्याकरता त्यांना (ख्रिश्चृमुसलमान धर्मांसारखे) भीतिदायक नियमही कधी करावे लागले नाहीत. जनतेला शहाणं करणं आणि आदर्श जीवन जगण्याकरता वेळोवेळी मार्गदर्शन देणं, तद्वतच, दृश्य जगतामागं असलेल्या त्या अदृश्य शक्तीचा साक्षात्कार होण्याला साह्य करणं हे आवश्यक असतं. त्यामुळं हिंदुत्वात माणसांना विचारस्वातंत्र्याकरता मोकळीक असते, आणि आपल्याला आवडण्ऱ्या मार्गाचा अवलंब करायची मोकळीक मिळते. पुन्हा, हे विविध मार्ग परस्परांशी सामंजस्यानं वागत राहतात.
मी कॅथॉलिक चर्चच्या वातावरणात वाढले. त्यामुळं मनाचा कोतेपणा कसा असतो आणि तो बालकांवर कसा लादला जातो, हे मी अनुभवलं आहे. आक्रमकांनी आणलेल्या पोथीनिष्ठ रिलिजनांवर स्वातंत्र्यातही इतकी कृपा का केली जाते, याचं मला नवल वाटतं. खऱ्या स्थानिक धर्मावर त्यांचा अनिष्ट पगडा बसत आहे. त्याचा अंतर्भाव शिक्षणात करायला हवा. खऱ्या जातीयतेचा धोका राजकारण्यांना दिसत नाही का? हे पोथीनिष्ठ रिलिजन अन्य मार्गानं जाणाऱ्यांना शांततेत जगू देणार नाहीत, हे त्यांना कळत नाही का? दोन्ही रिलिजनांना आपला प्रभाव वाढवायचा आहे. आणि दोन्ही साऱ्या जगात राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या बलवान आहेत. जोवर त्यांची संख्या अल्प आहे, तोवरच ते नरमाईनं वागतील, आणि आपले विचार आणि आपली सुप्त उद्दिष्टं प्रकट करणार नाहीत. पण, लोकसंख्येचं त्यांचं प्रमाण धोक्याच्या पातळीकडे वेगानं जाण्याचा डाव आहे.
ख्रिश्चन आणि मुस्लीमांना आपापलं स्वतंत्र अस्तित्व टिकवायच्या हक्काकरता, तथाकथित सेक्युलरच लढा देत असतात. खरं तर सर्वांनाच आपल्या रिलिजनांत ओढून आणायचं हाच त्यांचा अंतस्थ हेतू आहे, आणि हे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काय? जे कधीही पडताळून पाहता येणार नाही, अशा तथ्यावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे, हे सांगण्याचा हक्क! पण ह्या असल्या तथ्यांच्या पालनातून भविष्यात होणाऱ्या विविध फाळण्यांच्या धोक्याकडे शिक्षित हिंदु दुर्लक्ष का करीत आहेत? पुन्हा त्यातून आणखी रक्तपातांचाही धोका राहणआरच आहे.
जनतेत दुहीची बीजं पेरणाऱ्या, जातीय वृत्ती पसरवणाऱ्या ह्या रिलिजनांना कोणीच उत्तरदायी मानायला सिद्ध नाही आणि सर्व चराचर सृष्टीत ब्रह्म पाहणाऱ्या हिंदुत्वाला मात्र अकारणच धारेवर धरलं जात असतं, हे विलक्षणच नव्हे काय? (हिंदुत्वाप्रमाणं) सर्वसमावेशक नसणाऱ्या ह्या दोन पोथीनिष्ठ रिलिजनांनी इतरांचा आदर करायला हवा, असंही कुणी बोलत नाही. उलट त्यांचा द्वेष करायची मुभाच दिली जाते. आजच्या काळातही तथाकथित, “अश्रद्धांना” ठार मारायलाही मुस्लीम कचरत नाहीत, हे भयावह होय. मुस्लीमांकडून प्रेरणा घेऊन क्रूरपणं कत्तली करणाऱ्या इसिसला माध्यमंसुद्धा फारसं दोष देत नाहीत. उलट, हिंदूनं कुणा मुस्लीमाला मारलं तर त्याला भरपूर प्रसिद्धी दिली जाते, ती का?
ती सर्वोच्च शक्ती काहींना पोटाशी घेते आणि इतरांचा द्वेष करते, असं काही ग्रंथांतून प्रतिपादलेल्या ह्या तथ्यातून उद्भवणाऱ्या ह्या माथेफिरूपणाला खरं तर, सर्वांनी आळा घालायला हवा. पण, त्यांना असा विचार करायला कसं लावायचं आणि हिंदुमानसिकतेचा स्वीकार कसा करायला लावायचा?
काही कडव्या “सेक्युलर”भारतीयांनी गेल्याच आठवड्यात एकाएकी आपण हिंदु असल्याचं प्रकट केलं. कदाचित, इतरांनीही आपलं अनुकरण करावं हाही हेतु असेल. तरीही, हिंदूंचा सर्वोच्च शक्तीवर विश्वास असतो, तो स्वतः शाकाहारी आहे की नाही, हाही प्रश्न नसतो, तो मंदिरांत जावो वा न जावो, वेदांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करो वा न करो. ते सर्व काही, हिंदूंना चालतं, असा प्रचार काहीजण हिंदुत्वाबद्दल करतात, किंवा तसं त्याचं चित्र लोकांत उभं करतात. हिंदू मूलतत्त्ववादी नसल्याचंही ते प्रतिपादन करतात.
तरीही ते उचित नाही. हिंदुत्वातही मूलतत्त्वं आहेत, पण, ती सर्व उपयुक्त आणि साह्यकारी आहेत.
ऋषींच्या अंतर्ज्ञानाची किंमत माहीत असणं आणि जो त्यांच्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करणं म्हणजे हिंदु असणं. त्यांचं ते अंतर्ज्ञान आपल्याला असं सहजासहजी कळणारं नाही, उदाहरणार्थं सर्व निसर्ग, चराचर सृष्टी त्या ब्रह्मानं भरलेली आहे, ही बाब कळणं सोपं नाही. परंतु, त्याचा साक्षात्कार करून घेणं शक्य असतं. जसं पृथ्वी सूर्याभोवती फेऱ्या घालीत असते हे आपल्या इंद्रियांना कळत नसलं तरी ते सिद्ध करता येतं. तसंच. पण, अंधश्रद्धा ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नसते.
मनुष्य, मनुष्येतर प्राणिजगत, वनस्पती इत्यादी सर्वांचं कल्याण चिंतणं हेसुद्धा हिंदुत्वाचं लक्षण मानता येतं. कारण सर्वांच्या अंतरात एकत्वाचं सूत्र असतं, आणि ती सर्व ब्रह्माशीही जोडलेले असतात. गाईला पवित्र का मानायचं आणि तिची हत्या का करायची नाही, ह्याचं कारणही ऋषींनी सांगितलं आहे. (लेखाच्या अखेरीस एका व्हिडिओचा दुवा दिला आहे. कदाचित, तो पाहिल्यावर माणसांना मांसाहार करावासा वाटणार नाही.)
आपल्या अंतःप्रेरणेला स्मरून वागणं, आपल्या बुद्धीचा चांगला आधार घेणं, हेसुद्धा हिंदु असण्यात सामावलं आहे. निराळ्या शब्दांत, हिंदुत्व म्हणजे आपल्याच अंतःकरणात बुडी मारून आपल्या अस्तित्वाचा शोध घेणं असंही म्हणता येईल. म्हणजे आपल्याच अंतरात्म्यावर विसंबणं आणि योग्य वेळी योग्य कृती करणं.
हिंदु असणं म्हणजे शहाणपणा बाळगणं, खुळचट वर्तन न करणं. विश्वामागील जाणीव ती हीच. जीवन कसं जगावं, हे समजणं ही बाबसुद्धा हिंदुत्वात बसते. हे सर्व तत्त्वज्ञान हिंदुस्थाननंच चांगल्या प्रकारानं टिकवलं आहे. तरीही ते सकल विश्वाला उपुक्त ठरणारं आहे. सर्व मानवजातीला अनुकरण करणंयासारखं आहे.
हे सारं समजून घेणं सर्व जगाच्या कल्याणाककरता अत्यावश्यक आहे, हे समजण्याची वेळ आली आहे ना?
Disclaimer: The opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article.