भारतात अतिरेकी किती आहेत? आणि पाकिस्तानात किती आहेत?
रिलिजन आणि अतिरेकी प्रकारांवर चालू असलेली चर्चा किती गोंधळाची, सत्याला सोडून आणि खोडसाळ आहे? विधानसभेच्या निवडणुकीत आणि राष्ट्रसंघात नुकत्याच झालेल्या चर्चेत ही बाब अगदी स्पष्ट झाली. परराष्ट्रमंत्री सुषमांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वक्तव्यात पाकिस्तानचे एक मुत्सद्दी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना एक निर्लज्ज हिंदु अतिरेकी म्हणाले. त्याचं कारण धार्मिक दृष्ट्या हिंदु अधिक उच्च पातळीचे आहेत असं योगी म्हणाले होते. आणि सर्व हिंदुस्थानभरच हिंदु धर्म उच्चतम असल्याची भावना जोपासली जात असल्याबद्दल त्यांनी कुरकूरही केली.
ह्यातील विरोधाभास कुणाच्या लक्षात आला?
हिंदुधर्म मुस्लीम आणि ख्रिस्ती रिलिजनांहून उच्चतर आहे, असं प्रतिपादन करणारे हिंदु अनेक आहेत, अशी पाकिस्तानची तक्रार आहे. त्या हिंदूंनाच पाकिस्तान अतिरेकी आणि मूलतत्त्ववादी म्हणत असते. रास्वसंघासारख्या हिंदु संघटनाच असल्या तऱ्हेचं वातावरण पसरवीत असतात, असाही त्यांचा दावा आहे.
आता पाकिस्तानाचं अस्तित्व कशामुळं आहे, ते पाहू. त्यामागील प्रेरणाच इस्लाम होय. भारतातच काही भूभाग तोडून एक स्वतंत्र देश बनवण्यात आला. ज्यांचे पूर्वज हिंदूच होते, पण काही ना काही कारणाने मुस्लीम झाले, त्यांनाच वेगळं होऊन इस्लामच्या तंत्राप्रमाणं राहण्याची इच्छा होती, कारण त्या मार्गानंच आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, अशी त्यांची श्रद्धा बनली होती. तो तोडलेला तुकडाच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान नावानंआज ओळखला जात आहे. हिंदुधर्म आणि परंपरांऐवजी पाकिस्तानातील शाळांमधून इस्लामचीच शिकवण दिली जाऊ लागली. इस्लामवर कोणत्याही प्रकारानं टीका करण्यावर बंदी आहे. निंदाबंदीचा निर्बंधही संमत करण्यात आला. त्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा दिली जाते. धार्मिक अल्पसंख्यांकांच जीवन अतिशय खडतर आहे. बहुतेक सर्व हिंदूंना देशाबाहेर हाकलण्यात तरी आलं, किंवा ठार तरी करण्यात आलं किंवा इस्लाम स्वीकारायला भाग तरी पाडण्यात आलं. परिणामी आरंभीची त्यांची टक्केवारी १५ वरून आज २ वर घसरली आहे.
मग जे स्वतःच्या देशात केवळ मुस्लीम रिलिजनचा केवळ प्रसारच करतात असं नसून, इतर कोणत्याही उपासनापंथांना, वेगळ्या परंपरांना जगूही देत नाहीत, उलट इस्लामच्या नावाखली दडपून टाकल्या जातात, त्या देशातल्या एखाद्या प्रांजल व्यक्तीला भारतामध्ये हिंदूंनी हिंदुधर्माचा पुरस्कार केला तर, हिंदूंच्या धर्मप्रसारावर आक्षेप कसा घेता येईल? तरीही, फाळणीपासून भारतामध्ये मुस्लीम लोकसंख्या सतत हिंदूंच्या बरोबरीनं वाढत आहे. तर मग भारतात अतिरेकी कुठं आहेत आणि पाकिस्तानात कुठं आहेत?
ह्या आरड्याओरड्यामागं एक हेतू आहे. राष्ट्रसंघाच्या त्या संमेलनात पाकिस्तान आणि इस्लाम ह्यांच्यांतील घनिष्ठ संबंधाबद्दल कोणीही बोलण्याचा संभव नसल्याची खात्री होती. आणि माध्यमामधील कुणी बोलणार नाही, ह्याचीही खात्री होती. तसा काही एक अलिखित संकेत असावा, असं वाटतं. आणि करायचाच तर तो इस्लामची भलामण करण्याकरताच केला तर चालतं. आणि हिंदुत्वावर टीका करायला आडकाठी नाही!
भारतावर आपण काही टीका केली तर आपल्याला पाठिंबाच मिळेल याची त्याला खात्री असावी. का? त्यामागं होते बिनसरकारी संस्था (NGO), माध्यमं, आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी. त्यांच्याबद्दल तर शंकाच नको. कारण, नरेंद्र भारताला हिंदु राष्ट्र बनवतील असं सांगून सर्वांना, विशेषतः, ख्रिस्ती आणि मुस्लीमांना हिंदूंच्या दयेवर निभावण्याची पाळी येण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी घातली नसती. ह्या साऱ्यामागं हिंदूंना अतिरेकी, आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसतं. त्यामुळं जिहादींपासून असलेला खरा धोका असल्याचं लपवता आलं असतं. तोच तर इस्लामचा खरा हेतू आहे.
कोणत्याही आतंकवादाला एक हेतु असतो. मग जिहादींच्या आतंकवादामागं कोणता हेतु असेल? ज्यात केवळ मुस्लीमच असतील आणि एकही मुस्लीमेतर नसेल, असं एक जग त्यांना हवं आहे. केवळ हाच त्यांच्या हेतुमागील गाभा त्यांच्या ग्रंथांतून स्पष्ट होतो. तसं साध्य करता येईल इतकीच त्यांची अपेक्षा नाही, तर तसं केल्यावर, म्हणजे मुस्लीमेतरांना कठोरपणं वागवल्यानं, ठार केल्यानं. कोणताही दोष न लागता त्यांना त्याचं पारितोषिकही अल्लाकडून मिळेल, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. त्यांच्या दृष्टीनं अश्रद्ध असणाऱ्या कोट्यवधी निरपराध्यांना ठार करण्याचं कार्य त्यांनी कित्येक शतकं केलंच आहे, आणि ते आजही थांवलं नाही. हे केवळ इसिसच करते असं नसून सगळेच इस्लामी करीत असतात.
खरं तर इस्लमाच्या अतिरेकाला बळी पडलेले आणि त्यासाठी उत्तरदायी असलेले, ह्यांच्यांत फारच थोडा भेद आहे. कत्तल करणाऱ्यांचे पूर्वज बाटून मुसलमान झाले आहेत आणि इस्लाम एकमेव सत्य असल्याचं जे मान्य करणार नाहीत त्यांच्यांबद्दल द्वेष त्यांच्यांत ठासून भरला आहे.
विश्वाचं धारण करणारी सर्वोच्च शक्ति तिरस्कारानं आणि हेव्यानं भरलेली असावी आणि जे तिचं अस्तित्व मान्य करणार नाहीत त्यांना ती मरणोत्तर नरकाग्नीत जळत ठेवील ही कल्पना अविश्वास ठेवण्यासारखी नाही. तरीही जगाची अर्धी लोकसंख्या असणारे मुस्लीम आणि ख्रिश्चन तशी श्रद्धा प्रामाणिकपणं बाळगून आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ख्रिस्त्यांचा गॉडही असाच मत्सरानं भरला आहे आणि त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांचा तो त्याग तर करतोच पुन्हा वर त्यांना नरकाग्नीत जळत ठेवतो म्हणे. आणि असल्या प्रकारचा देव म्हणजेच खरे सत्य असल्याचा दावा त्याहूनही वाईट आहे. उलट खरे सत्य असणारा हिंदुधर्म तिरस्काराला पात्र व्हावा हेच पटत नाही. पण तोच जुनाट, असंस्कृत आणि रानटी असून त्यांची मूर्तिपूजा अनुचित आहे, असं ठरवलं जात आहे, हेही अस्वीकार्यच होय.
काही सुप्त हेतु मनात असल्यामुळं राष्ट्रसंघाचे कित्येक मुत्सद्दी ह्या तर्काला बळी पडले आहेत. आणि हिंदुत्वाचा प्रसार हिंदुस्थानातच थांबवायला हवा, अशा चळवळीला ते मान तुकवीत आहेत. उलट, मुस्लीम आणि ख्रिस्ती हिंदुस्थानात आपले हातपाय परसवण्याचं काम चालवीतच आहेत.
इतकं असत्य काहीच नसेल. हिंदुधर्माच्या तत्त्वज्ञानात बुडी मारून शोध घेणाऱ्यांना तो ह्या दोन तर्कहीन रिलिजनांतील तत्त्वांपेक्षा किती तरी उच्च आहे, हे सहज पटेल.
असं मी का म्हणते ह्याचं एक कारण सांगते. हिंदुधर्म सर्व जगात बंधुभावाचा (वसुधैव कुटुंबकम्) प्रसार करू पाहतो आहे. कारण सर्व चराचर सृष्टीच्या अंतर्गत तेच तत्त्व असल्यानं मुळातच ते सत्य आहे. ह्या उलट, ख्रिस्ती आणि मुस्लीमांचा बंधुभाव सशर्त आहे. जे त्यांची तत्त्वं मान्य करतील त्यांनाच बंधु मानता येईल, ही त्यांची शर्त आहे. कारण ते सर्वोच्च तत्त्व अनुक्रमे केवळ मुस्लीम आणि ख्रिस्त्यांबद्दलच प्रेमभाव आणि इतरांबद्दल तिरस्कार, बाळगतं!
ह्यांतलं कोणतं सत्य असल्याच संभव अधिक आहे? सकल चराचर विश्व आंतरिक पातळीवर एकच असतं, ह्या हिंदूंच्या दृष्टिकोनाला तर आता विज्ञानानंही सज्जड पाठिंबा दिला आहे.
रिलिजनांनी सत्य सांगावं, अशी अपेक्षा असते. आणि सत्य तर एकमेव असतं. त्यामुळं सत्याबद्दल बोसणाऱ्या निरनिराळ्या रिलिजनांनी सांगितलेली तथ्यं परस्परांशी पडताळून पाहिली पाहिजेत. आणि मग त्यातलं कोणतं तथ्य खरोखरीच सत्य असण्याचा संभव अधिक आहे, ते ठरवलं पाहिजे. आणि जे तथ्य सत्य असण्याचा संभव सर्वाधिक तेच स्वाभाविकपणं सत्य आणि सर्वोच्च ठरेल.
एरवीच्या जीवनातसुद्धा आपण निरनिराळ्या वस्तूंमधील कोणती चांगली आहे, हे पाहून मगच तिचा स्वीकार करीत नसतो का? कोणीही विचारी व्यक्ती हेच करील. मग आयुष्याबद्दल सामान्यांना शिकवू इच्छिणाऱ्यांनीही, माणसांनी कसं जगावं, विश्वाशी, निसर्गाशी कसं वागावं, ह्याबद्दल बोलणाऱ्यांनीही असंच वागायला नको का?
खरं तर ऐतिहासिक दृष्ट्या कितीतरी नंतर उद्भवलेल्या पोथीनिष्ठ रिलिजनांहून हिंदुधर्माचं ह्या बाबतीतील श्रेष्ठत्व कुणाही बुद्धिमान व्यक्तीला सहज जाणवेल. पण उलट, पोथीनिष्ठच आपापल्या श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवीत असतात. पण, त्यातूनच त्यांची पुरातन हिंदुधर्माशी तुलना होईल. मात्र उलट, केवळ आपला रिलिजनच सत्य असल्याचं आणि आपल्याच पवित्र ग्रंथांतून खरा देव दिसतो, आणि नरकाग्नीत जळण्यापासून वाचण्याकरता त्यालाच सर्वांनी भजलं पाहिजे, असा आग्रह दोघेही धरीत राहतात.
हा दावा बालकांच्या डोक्यावर सातत्यान ठोकला जात असतो. वर पुन्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य प्रौढपणीही त्यांना नसतं. कारण, “नरकाग्नीचा दावा खरा असलाच तर?” असा विचार करून ते तोच विचार अंधळेपणानं मनात धरून राहात असावेत. आणि मग बुद्धीचा उपयोग न करता आपल्याला तद्वतच विश्वाला काय उपयुक्त आहे आणि काय घातक आहे, ह्याचा विचार ते करीतच नसावेत.
The article has been translated from English into Marathi by Professor Manohar Railkar
Featured Image: Zee News